पालघर : वाघोबा खिंडीत दरोडेखोरांची नागरिक, वाहनांवर दगडफेक

Continues below advertisement
पालघरच्या वाघोबा खिंड परिसरात दरोडेखोरांनी काल रात्री अक्षरश: हैदोस माजवला. दरोडेखोरांनी इथल्या नागरिकांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. रात्री ११च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. पोलिसांना तक्रार केल्यावर पोलिस तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोबत राज्य राखीव दलाच्या काही तुकड्याही दाखल झाल्या. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये काही दरोडेखोरांना गोळ्या लागल्या. यानंतर पोलिसांनी चार दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. तर इतर दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram