पालघर : मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप शिवसेनेनेच बनवली : रवींद्र चव्हाण

Continues below advertisement
पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना सामा, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काल पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली आणि हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा केला आहे. प्रत्येक निवडणुकीत क्लिप बनवणं आणि बदनामी करणं हेच शिवसेनेचं काम आहे. असं प्रत्युत्तर भाजपचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram