पालघर : खैर झाडाच्या लाकडाची राजरोसपणे तस्करी

डहाणु वनविभागाअंतर्गत उधवा वनपरीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैर झाडाची कत्तल केलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. खैर झाडाच्या लागडाचे हजारो नग हस्तगत केले असून बाजारात त्याची किंमत लाखोच्या घरात आहे. आरोपी विष्णु सुतार सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे. पालघरमधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती असून या जंगलातून तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असताना वन विभागाचे याकडे लक्षच नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola