पालघर : खासजी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Continues below advertisement
पालघर पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खाजगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील १७ नंबरच्या मतदान केंद्रावरील मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दिपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी प्रोसिडिंग ऑफिसर दीपक खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय... तर अजून काही जाणांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement