पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आमने-सामने
Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई रंगण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आलीय.. आज वनगा यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. सध्या पालघर शहरात शिवसेनेनं भाजपाला उत्तर देण्यासाठी चांगलंच शक्तिप्रदर्शन केलंय... दुसरीकडे, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचं निधन झाल्यानं पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबानं शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Continues below advertisement