Rickshaw on Platform | रुग्णासाठी रिक्षा रेल्वे फलाटावर, मात्र माणुसकी दाखवणाऱ्या चालकावर गुन्हा | ABP Majha
Continues below advertisement
पालघर रेल्वे स्थानकात फलाटावर रिक्षा आणणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या होत्या. त्यावेळी पालघर स्थानकात या वृद्धाची प्रकृती बिघडली. रेल्वे स्थानकावर उपचारांची व्यवस्था नव्हती आणि डॉक्टरही उपस्थित नव्हते. त्यामुळे वृद्धाला रुग्णालयात नेण्याचा सल्ला परिचारिकेनं दिला. मात्र रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकाही नव्हती. त्यामुळे या वृद्धाला रिक्षाने रुग्णालयात नेण्याचे ठरवण्यात आलं. या वृद्धाची प्रकृती लक्षात घेता रिक्षा थेट फलाटावर आणण्यात आली. या रिक्षातून त्याला तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र बिकट परिस्थितीत माणुसकी दाखवणाऱ्या या रिक्षाचालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय
Continues below advertisement