पालघर : आरटीओच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल
Continues below advertisement
वसई, विरार, डहाणूसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. आरटीओ पासिंग बंद झाल्याने वसई, विरारच्या रिक्षाचालकांनी एक दिवसाचा तर पालघरच्या रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला. पालघरच्या आरटीओने पालघर इथं कुठल्याही गाडीचं पासिंग करायचं नाही, असं ठरवलं आहे. आणि गाड्यांच्या आरटीओ पासिंगसाठी आता आरटीओ कार्यालय कल्याण येथे स्थलांतरीत केल्याने शिवसेना पुरस्कृत संघटनांनी हा बंद पुकारला आहे. मात्र यामध्ये वसई, विरारचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या रिक्षा बंद केल्यामुळे एसटीलाही मोठी गर्दी पाहायला मिळतेय. तरी, सकाळच्या वेळेत ऑफिसला जायला निघणाऱ्या नोकरदारांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
Continues below advertisement