पालघर : पोलीस भरतीसाठी 160 जागा, उच्चशिक्षितांसह 19 हजार जणांचे अर्ज
Continues below advertisement
पालघरमध्ये पोलीस शिपाई भरतीसाठी चक्क उच्चशिक्षीत तरुणांचे अर्ज आलेत. 160 जागांसाठी तब्बल 19 हजार जणांनी अर्ज केलेत...सर्वात धक्कादायक म्हणजे यामध्ये डॉक्टर, अभियंते, वकील, वास्तुविषारद, माहिती तंत्रज्ञ झालेल्या तरुणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे .पोलिस शिपाईपदासाठी केवळ 12 वी उत्तीर्ण ही पात्रता आहे...त्यामुळे उच्चशिक्षणाला लाखोंच्या घरात पैसा खर्चुनही नोकरीची शाश्वती नसल्यानं तरुण नाऊमेद होत चाललेत..त्यामुळे एकीकडे खासगी नोकरीचा कल कमी होतोय...तर सरकारी नोकरीतील फायदे आणि शाश्वतीची हमी यामुळे सरकारी नोकरीकडे ओढा वाढतोय..हेच पालघरच्या चित्रावरुन स्पष्ट होतंय.
Continues below advertisement