इस्लामाबाद : हाफिज सईदला साहेब संबोधल्यावरुन अमेरिका नाराज, पाकला खडसावलं
Continues below advertisement
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हाफिज सईदला साहेब म्हटल्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावलेत. हाफिज सईद हा कोण आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. तो एक दहशतवादी असल्याचं यापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासीने दहशतवादी हाफिज सईदला साहेब म्हणून संबोधलं होतं. दरम्यान, हाफिज सईद विरोधात कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत. तसंच पाकिस्तानंन दहशतवादा विरोधात कारवाईचं केवळ नाटक केल्याचं सांगत अमेरिकेने पाकिस्तानची कोट्यावधी रुपयांची मदतही रोखली आहे.
Continues below advertisement