पाकिस्तान : 8 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, कसूर शहरात हिंसक आंदोलन

Continues below advertisement
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. ८ वर्षाची मुलगी घराजवळ असलेल्या शिकवणीला गेली होती. गेल्या आठवड्यात गुरुवारी ती बेपत्ता झाली. तिचं अपहरण झाल्याचं सांगण्यात आलं. यानंतर एका अज्ञात व्यक्तीसोबत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी शोध मोहीम राबल्यानंतर त्यांना बेपत्ता मुलीचा मृतदेह मंगळवारी कचराकुंडीजवळ आढळून आला. मुलीची हत्या चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करत पंजाबमधील कसुर शहरात हिंसक आंदोलन झालंय. दगडफेकीत 2 जणांचा मृत्यू झाला... त्यामुळे आता चिमुरडीच्या मारेकरांना लवकर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत पाकिस्तानमधील जनता रस्त्यावर उतरलीए...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram