मुंबई : देशातील 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे, ऑक्सफेमचा अहवाल

Continues below advertisement
देशातील जवळपास तीन चतुर्थांश (73 टक्के) संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे एकवटल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे, 2017 या वर्षात भारताला नवे 17 अब्जाधीश मिळाले आहेत, तर दुसरीकडे अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या संपत्तीत फक्त एका टक्क्याने वाढ झाली आहे. म्हणजे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, तर गरीबांच्या संपत्तीत वाढ झालेली नाही.

'ऑक्सफेम'च्या 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' या अहवालात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ऑनलाईन सर्वेक्षण आणि प्रमाणित आकड्यांच्या आधारे हा अहवाल काढण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram