उस्मानाबाद : जलयुक्त शिवार घोटाळा : पंकजांच्या परळीमध्ये 24 कर्मचाऱ्यांवर गुन्हे
Continues below advertisement
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी 24 अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळी पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी 24 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.
Continues below advertisement