पुणे : यूपीएससीत महाराष्ट्रातून पहिला आलेल्या गिरीश बदोलेची पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात सलग दुसर्या वर्षी उस्मानाबादचा झेंडा कायम राहिला आहे. दोन एकर शेतीवर चरितार्थ चालवणार्या दिलीप बदोले यांचा मुलगा गिरीश बदोले याने यूपीएससी परीक्षेत देशात 20 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.