उस्मानाबाद : तुळजापुरात दुकानदारांकडून भाविकांची फसवणूक

Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दारात भक्तीचा बाजार मांडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भवानी रोड, महाद्वार रोड आणि कामे गल्लीत असलेल्या काही दुकानांमधून भाविकांची फसवणूक सुरु असल्याचं उजेडात आलं आहे. देवीला अर्पण करण्यासाठी वापरलं जाणार 8 रुपयांच्या चिरडी वस्त्राला अडीच ते तीन हजार रुपयाचं महावस्त्र बनवून भाविकांच्या माथी मारलं जात आहे. फसवणुकीचा हा प्रकार तुळजापुरातील सजग नागरिक विजय भोसले यांनी एबीपी माझाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. एका साडीचे दोन ते तीन तुकडे करुन त्याचं तथाकथित महावस्त्र बनवून ते भाविकांच्या माथी मारलं जात आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची अशा प्रकारची विटंबना कशी थांबणार, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram