लालपरी संपावर : बीड : 14 एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई, ठाण्यातही 8 कर्मचारी निलंबित
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण मुंबई आणि उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
मुंबईतल्या परळमध्ये काही कर्मचार्यांना ताब्यात घेतलंय. परळ डेपोतून एसटी पोलिस बंदोबस्तात बाहेर काढताना ज्या कर्मचाऱ्यांनी एसटीला अडवलं, त्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय.. तिकडे उस्मानाबादमध्ये एसटीच्या संपामध्ये सहभागी झालेल्या 3 एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीय.. तर तिकडे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात एसटीच्या बंद दरम्यान एसटीची तोडफोड करण्यात आलीय... भोकर येथून नांदेडकडे निघालेल्या एसटीवर एका अज्ञात व्यक्तीने दगड मारुन काचा फोडल्याची घटना घडलीये... शिवाय हदगावकडे निघालेल्या बसवरही दगडफेकीची घटना घडलीये...