
उस्मानाबाद : भारावलेल्या सचिन तेंडुलकरचं डोंजा गावात जंगी स्वागत
Continues below advertisement
मास्टर-ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर आज दत्तक घेतलेल्या उस्मानबादच्या डोंजा गावच्या दौऱ्यावर आहे. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला. गावकऱ्यांनीही सचिनचं जंगी स्वागत केलं. खासदार दत्तक ग्रामयोजनेत सचिननं डोंजा गावची निवड केली आहे. आजच्या दौऱ्यात सचिन या गावात झालेल्या विकासकामांची पाहणी करणार आहे. सचिनला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
Continues below advertisement