उस्मानाबाद : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं कृषी आयुक्तांना खरमरीत पत्र
Continues below advertisement
कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी खर्च करण्यात अपयश आल्याच्या मुद्यावरून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खरमरीत पत्र लिहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक वर्ष संपत आलं तरी निधी खर्च न होणं ही खेदाची बाब असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. या बाबीला जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून खर्चाबाबतचा अहवाल 19 मार्च रोजी समक्ष हजर राहून सादर करावा, असा आदेश फुंडकरांनी दिले आहेत.
Continues below advertisement