बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?
Continues below advertisement
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवड होणाऱ्या सहा जागांसाठी राज्यात मतदान होत आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेत एका मतासाठी तब्बल पाच लाख रुपये दिले जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला पैसे पोहोचले नाहीत, हे सांगण्यासाठी मतदार अनोखा कोडवर्डही वापरत असल्याचं बोललं जात आहे.
पैसे न पोहोचल्यामुळे उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक मतदानकेंद्रावरुन मतदान न करताच माघारी फिरल्याची माहिती आहे. मात्र काही वेळात हे नगरसेवक पुन्हा मतदानासाठी येणार आहेत. त्यामुळे केवळ पैसे पोहोचले नाहीत म्हणून मतदान केंद्रावरुन मतदानाविना फिरण्याचा कोड वापरला जात असल्याच्या चर्चा उस्मानाबादेत रंगत आहेत.