उस्मानाबाद : छेडछाडीचा विरोध करणाऱ्या आई-वडिलांना सळई, हंटरने मारहाण!

अल्पवयीन मुलीची छेडछाड का केली? अशी विचारणा करणाऱ्या आई-वडिलांना आठ जणांनी सळई आणि हंटरने जबर मारहाण केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील मळगी गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेत मुलीचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola