उस्मानाबाद : दुधाचे दर घसरले, शेकडो टन खवा कोल्ड स्टोरेजमध्ये
Continues below advertisement
सध्या ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेला दूध व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. दुधाचे दर घसरल्यानं दूग्धजन्य पदार्थांच्या बाजारावरही विपरित परिणाम दिसून येत आहे. उस्मानाबादमधल्या भूमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दीडशे टनापेक्षा जास्त खवा पडून आहेत. बरेच दिवस राहिल्यामुळे आता खव्यावर बर्फाचे दवबिंदू तयार होऊ लागले आहेत. लग्नसराई सुरु असतानाही मुंबई, हैद्राबाद आणि पुण्यातून खव्याची मागणी चांगलीच घटली आहे.
Continues below advertisement