उस्मानाबाद : मोठा चारा घोटाळा, चाऱ्याचं बेणं म्हणून शेतकऱ्यांना वाळलेलं गवत
उस्मानाबादमध्ये चारा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. चाऱ्याचं बेणं म्हणून चक्क गवताचं ठोंब वाटप करण्यात आलं. प्रत्यक्षात हे सर्व वाळलेलं गवत निघाल्याने शेतकरी संतापले आहेत.
जेव्हा हे वाळलेलं गवत शेतकऱ्यांसमोर पोहोचलं, तेव्हा या गवताचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर पशु संवर्धन विभागाकडेही नव्हतं.
संतापलेल्या शेतकऱ्यांनी गवताच्या पेंढ्या मोडून टाकल्या. योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. या गवताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.