उस्मानाबाद : शेतमाल विकत घेण्यासाठी सरकार खासगी कंपन्यांशी करार करणार : महसूलमंत्री
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पन्नाला भाव देणं हे सरकारच्या पुढील मोठं आव्हान आहे. त्यामुळं शेतमाल विकत घेण्यासाठी सरकार अॅग्रो पर्चेसिंग कंपन्यांशी चर्चा करत आहे असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते. सरकारचं काम हे सरकार चालवणं आहे, व्यापार करणं नव्हे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सरकार टाटा, बिर्ला यासारख्या विविध कंपन्यांना याबाबत आव्हान करत आहेत. राज्य सरकार आणि खाजगी कंपन्या यांच्यात याबाबत करार होईल. कंपन्यांना प्रोडक्ट विकून तोटा झाला तर सरकार त्याची भरपाई करेल असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Continues below advertisement