उस्मानाबाद: बस-दुचाकी अपघातात तरुणी थोडक्यात बचावली
Continues below advertisement
दैव बलवत्तर असेल तर मृत्य़ूलाही चकवा मिळतो याचा प्रत्यय उस्मानाबाद शहरात आला आहे. भरधाव बस आणि दुचाकीच्या अपघातात एक तरुणी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला मात्र तरुणीला साधं खरचटलं सुद्धा नाही. उस्मानाबाद शहरातील पोलिस लाईनसमोर हा अपघात झाला. मागून आलेल्या भरधाव बसच्या समोर युवतीची गाडी आल्यानं हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या ठिकाणाहून ही युवती उठून चालू लागली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Continues below advertisement