उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद : सुरेश धस विजयी
Continues below advertisement
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.
सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 74 मतांनी मात केली आहे.
भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 526 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मतं मिळाली. नोटाला एक मत, तर 25 मतं बाद ठरली. सांकेतिक आकडे लिहिलेले असल्यानं 25 मंत बाद झाल्याची माहिती मिळते आहे.
सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाला आहे. अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या व राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. यात पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.