स्पेशल रिपोर्ट : बसवकल्याण : महात्मा बसवेश्वर
Continues below advertisement
कर्मकांड, जुनाट रुढी, परंपरा आणि प्रथा यावर आसूड ओढण्याचं मोठं काम आपल्या संतांनी केलं. त्यांनी प्रसंगी अख्ख्या जगाचा विरोध पत्करला. अन्याय, अत्याचार सहन केले. त्यातलंच एक नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर. त्यांनी कष्टाला प्राधान्य दिलं, दानधर्माला महत्व दिलं. आणि माणुसकी हा केंद्रबिंदू मानला. 12 व्या शतकात आंतरजातीय विवाह लावून त्यांनी कास्टलेस सोसायटीची निर्मिती करण्याचा पहिला प्रयत्न केला. आज त्या महात्मा बसवेश्वर अर्थात बसवराज मादीराज मंडिगे यांची जयंती आहे. पण आता लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी होतेय. त्यासाठी मोर्चे निघत आहेत. दुसरीकडे लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म नसल्याचं विरशैव मंडळीचं मत आहे. या घुसळणीत एबीपी माझानं लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या जिवनकार्याचा आढावा घेतला. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की खरंच लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का? या प्रवासात आम्हाला जे दिसलं ते तुमच्या समोर आहे.
Continues below advertisement