उस्मानाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे 100 मुलं दगावली, भगवानराव देशमुखांचा दावा
Continues below advertisement
अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मध्यान्ह भोजन न मिळाल्यानं गेल्या 14 दिवसात किमान 100 मुलं दगावल्याचा दावा अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केला. ते उस्मानाबादमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. इतकंच नव्हे तर सचिव विनित सिंघल यांच्यामुळे संप चिघळल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय मंत्र्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावाही देशमुखांनी केला.
Continues below advertisement