VIDEO | कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी होण्याची चिन्हं | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
कर्नाटकात पुन्हा एकदा सत्तेचं नाटक रंगू लागलं आहे. 2 दिवसांत कर्नाटकात भाजपची सत्ता येईल असा दावा, महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातील एच.नागेश आणि आर.शंकर या 2 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. स्थिर सरकारसाठी आम्ही काँग्रेस-जेडीएसला पाठिंबा दिला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. भाजप कर्नाटकात स्थिर सरकाराची स्थापना करू शकते, असा आम्हाला विश्वास असल्याचं एच.नागेश आणि आर शंकर म्हणाले.