Water Yoga | योग दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये वॉटर योगाचं आयोजन | ABP Majha
२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्तानं धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात वॉटर योगाचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यावेळी योग प्रशिक्षकांनी पाण्यात अनेक योगासनं, सूर्यनमस्कार सादर केले. पाण्यातला योगा सांधेदुखी, फुफ्फुसाच्या आजारांसाठी फायदेशीर असल्याचंही योग प्रशिक्षकांनी आवर्जून सांगितलं.