नवी दिल्ली : अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होणार?
Continues below advertisement
येत्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी भडका घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक्साईज ड्युटी कमी केली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 19 रुपये 48 पैसे, तर डिझेलवर 15 रुपये 33 पैसे एक्साईज ड्युटी आकारली जाते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने दोन रुपये एक्साईज ड्युटी कमी केली होती. मात्र तरीही पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.