कटक : चार वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं UNCUT भाषण

Continues below advertisement
केंद्र सरकारला झालेल्या चार वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विरोधकांचा समाचार घेतला. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईच्या भीतीने विरोधक एका व्यासपीठावर आले आहेत. हे ऐक्य देशासाठी नाही तर स्वत:च्या बचावासाठी आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांच्या एेक्यावर निशाणा साधला. तसेच सोनिया गांधींचं नाव न आम्ही 'जनपथा'वरून नाही तर 'जनमता'ने सरकार चालवतो  असा टोलाही मोदींनी लगावला. ओडिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटत असल्याचही मोदी म्हणालेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram