कोल्हापूर : राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार - विनोद तावडे
राज्यातल्या दोन कोटी विद्यार्थांचा विमा उतरवून विद्यार्थी आणि पालकांना संरक्षण देणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद ताव़डे यांनी केली आहे. या विम्याद्वारे आई वडीलांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षण थांबवावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होण्यास त्यामुळं मदत होणार आहे. शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते काल कोल्हापूर जिल्ह्ययातील नूल गावातील नवीन शाळेचं उद्धाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी तावडे बोलत होते.