पणजी(गोवा) : यंदाच्या इफ्फीतून रवी जाधवांचा 'न्यूड' सिनेमा बाहेर

Continues below advertisement
13 ज्युरींनी निवडला पण केंद्र सरकारनं डावलला असंच काहीसं घडलंय रवी जाधवच्या न्यूड सिनेमाबद्दल.. गोव्यात  रंगणाऱ्या इफ्फी म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामधून रवी जाधवचा न्यूड हा सिनेमा  वगळण्यात आला.. इफ्फीच्या इंडियन पॅनोरामा सेक्शनमध्ये म्हणजेच ज्यामध्ये भारतातल्या हिंदीसह प्रादेशिक सिनेमांचा समावेश असतो. त्यामध्ये न्यूड या सिनेमाची  निवड करण्यात आली होती. 13 ज्युरी मेम्बर्सनी न्यूडची निवड केली होती. मात्र आता अंतिम यादीतून हा सिनेमा वगळण्यात आला.  विशेष म्हणजे याच न्यूड सिनेमाने इफ्फी महोत्सवाला सुरुवात होणार होती. पण केंद्र सरकारने सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत सिनेमा वगळल्याचं बोललं जातं. एका मॉडेलच्या जगण्याचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आलाय. न्यूडशिवाय एस दुर्गा  हा मल्याळम सिनेमाही वगळ्यात आलाय.. गोव्यात 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी हा चित्रपट महोत्सव दरवर्षी रंगतो..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram