VIDEO | मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना बेदम मारहाण | सोलापूर | एबीपी माझा
पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी शहरात आणीबाणी लादल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काल केला होता. तो आरोप खरा आहे की काय अशा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सोलापूर जिल्हा एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. यात गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.