VIDEO | आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणार | मुंबई | एबीपी माझा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत प्रवास आता अधिक जलद होणार आहे. कारण आधी सिक्युरिटी चेकसाठी जो वेळ लागायचा तो आता कमी होणार आहे. सिक्युरिटी चेकनंतर बोर्डींग पासवर शिक्का मारण्याची आता गरज राहणार नाही. त्याऐवजी बोर्डींग पासवरचा बारकोड किंवा क्युआर कोड थेट मोबाईवरुन स्कॅन करता येईल. त्यामुळे सीआयएसएफकडून जो शिक्का मारुन घ्यावा लागतो, तो वेळ आता वाचेल, अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचं वापर करणारं मुंबई विमानतळं हे देशातलं पहिलं विमानतळ ठरणार आहे.