
नवी दिल्ली : मोबाईल अॅपद्वारेही पासपोर्टसाठी अर्ज करता येणार
Continues below advertisement
पासपोर्ट काढण्यासाठी करावा लागणारा खटाटोप ऑनलाइन नोंदणीमुळे बराचसा कमी झाला आहे. त्यातच आता ही प्रक्रिया परराष्ट्र खात्याने आणखी अपडेट केली आहे. स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे आपण कुठूनही पासपोर्टसाठी अर्ज करु शकतो. मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट सेवा अॅप' लॉन्च केली आहे.
Continues below advertisement