नोएडा: प्रियकराचा प्रेयसीवर चाकूनं हल्ला
Continues below advertisement
नोएडामध्ये प्रियकरानं प्रेयसीवर चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोएडाच्या जगत फार्म परिसरात ही घटना घडली आहे. कुलदीप नावाच्या प्रियकरानं आपल्या खुशबू नावाच्या प्रेयसीवर ती तडफडत असतानाही अनेकवेळा वार केले. तब्बल २५ ते ३० मिनिट ही युवती अक्षरश: तडफडत होती. एका प्लाझाच्या छतावर बोलण्यासाठी कुलदीपनं त्याच्या प्रेयसीला बोलावलं होतं. यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला. आणि याच रागातून त्यानं खूशबूवर वार केले. एवढ करुन न थांबता त्यानं स्वतावरही वार केले. दोघांचीही स्थिती गंभीर असून त्यांना नोएडाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement