मुंबई : यंदा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार नाही
यंदाचा 2018 सालचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला जाणार नाही. स्वीडिश अॅकॅडमीच्या एका सदस्याच्या पतीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे अॅकॅडमीबाबत वाद निर्माण झाला होता.याच कारणामुळे साहित्यातील नोबेल द्यायचे की नाही याचा निर्णय अधांतरी होता.. या स्कँडलमुळे अॅकॅडमीची बदनामी झाली आहे. #MeToo या मोहिमे अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात १८ महिलांनी अॅकॅडमीच्या सदस्य कॅटरिना फ्रॉसटेंशन यांचे पती क्लॉइड अर्नाल्ट यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. अर्नाल्ट यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. मात्र या संदर्भात अॅकॅडमीत दोन गट पडले आणि हा वाद वाढत गेला. अखेर हा पुरस्कार रद्द करण्याची वेळ आलीय. पुढील वर्षी म्हणजे 2019 साली दोन पुरस्कार जाहीर होणार आहेत.