VIDEO | मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही | एबीपी माझा
मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अर्थसंकल्प सादर करतील. निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्य मुंबईकरांना खूश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला जाईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 5 हजार कोटींच्या वाढीची शक्यता आहे.. सागरी किनारा मार्ग, प्रस्तावित गोरेगाव- मुलुंड लिंक रोड यासाठी भरीव तरदूतीची शक्यता आहे.. कचऱ्यावरही कर आकारण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.