मुंबई : यापुढे कुठल्याही महापालिकेला कचऱ्यासाठी जागा मिळणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
Continues below advertisement
यापुढेही कुठल्याही महापालिकेला डंपिंग ग्राऊंडसाठी जमीन मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरुन आज विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. प्रत्येक महापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट ही स्थानिक पातळीवर करावी त्यासाठी सरकार आर्थिक सहकार्य करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी रहिवासी सोसायट्यांनी वेगवेगवळे उपक्रम राबवावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. गेल्या 19 दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचरा कोंडी सुरु आहे. या प्रश्नावरुन अजित पवार आणि इम्तियाज जलली यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
Continues below advertisement