VIDEO | कुणाला ना कमी लेखतो ना मोठं- नितीन गडकरी | नागपूर | एबीपी माझा
भाजपातून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून नानांना आशीर्वाद दिला आहे. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली.