चेन्नई : जंगलातल्या वणव्यात 9 ट्रेकर्सचा होरपळून मृत्यू

तामिळनाडूतील कुरानगनी हिल्समधल्या जंगलात भडकलेल्या वणव्यामध्ये ९ ट्रेकर्सचा होरपळून मृत्यू झाला आहे. थेनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी एम.पल्लवी बलदेव यांनी सोमवारी ही माहिती दिली. ३६ ट्रेकर्सपैकी २४ जण चेन्नईचे आणि १२ जण तिरुप्पूरचे निवासी आहेत.
या सर्व ट्रेकर्सनी ओढया जवळच्या सुक्या गवतामध्ये आसरा घेतला होता. पण आग तिथपर्यंत पोहोचली आणि सुक्या गवताने लगेच पेट घेतला अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन एअर फोर्सने या सर्वांना वाचवण्यासाठी मोठी बचाव मोहिम राबवली ज्यात २१ जणांची सुटका करण्यात यश आलं. मात्र 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola