लातूर : निलंगा बसस्थानकात पोलिसाकडून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा बस स्थानकात माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना घडलीये. नागरिकांच्य सुरक्षेची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्या पोलिसांनीच बस स्थानकात दुपारी झोपल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका वृद्धाला मरेपर्यंत मारलंय.
६५ वर्षीय पांडुरंग मार्तंड आपल्या आजारी मुलीला भेटून गावाला परत जाण्यासाठी निलंगा बस स्थानकावर गाडीची वाट बघत झोपी गेले. त्यावेळी पोलीस कर्मचारी नामदेव कोळी यांनी त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात पांडुरंग यांच्या मुलाने तिथे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले पण उपचारानंतर ६ दिवसांनी त्यांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी मृताच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केलीये.