Yavatmal Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी यवतमाळमध्ये शिक्षक संपावर, विद्यार्थ्यांना फटका
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये बैठक पार पडली, पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जुनी पेन्शन योजना हा राज्यात कळीचा मुद्दा झाला आहे. यामागे विरोधकांचा डाव असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. तर याच मुद्द्यामध्ये आगामी निवडणुकीचा निकाल ठरवण्याची ताकद असल्याचं जाणकार सांगतात. ज्यांच्यासाठी हे आंदोलन होतेय, त्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे? याबाबत वेगवेगळे दावे केले जात असल्यामुळे संभ्रम आहे.
Tags :
Yavatmal Strike Devendra Fadnavis Old Pension Scheme Devendra Fadnavis Maharashtra Maharashtra Government EmployeesNagpur