Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव रात्रभर पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी ABP Majha

Continues below advertisement

यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे  राळेगाव तालुक्यातील झाडगाव या गावातील शंभरावरील घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. झाडगाव जवळ नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहेत. रात्रीपासून सुरू असलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने ओव्हर फ्लो होऊन  यातील पाणी झाडगाव या गावांमध्ये जाऊन जवळपास शंभरावर घरात हे पाणी शिरले आहे. राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वांना हलविण्यात आले असून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. या पुरामुळे नागरिकांच्या गरांची अन्नधान्य इतर साहित्याची मोठे नुकसान झाले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram