Yavatmal : यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी; दमदार पावसाच्या हजेरीमुळे कापूस लागवडीला वेग

Continues below advertisement

कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन ते तीन दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी राजा कापसाच्या टोबाणीच्या कामाला लागला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीन्या उरकल्याआहे.  त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे.  ज्या ठिकाणी हा पाऊस बरसला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरणीच्या कामाला वेग आला. पाऊस पुढे बरसेलच या आशेने शेतकऱ्यांनी लागवड पेरणी केली आहे. हवामान खात्याने पुन्हां आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने  येत्या 15 दिवसात 100 टक्के  लागवड पुर्ण  होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी  साडे आठ ते 9 लाख हेक्टर वर कपाशी ची लागवड करण्यात येते. 

हेही वाचा :

नाशिकच्या देवळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी सुखावले.या पावसामुळे शेती कामांना वेग.

हिंगोलीच्या सेनगावमध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. हवेत कमालीचा गारवा.

भिवंडीत तीन दिवसांच्या विश्रांती नंतर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर शहरात दमदार पाऊस. पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठेत गुडघाभर पाणी. अचानक पाणी वाढल्यानं भाजी मार्केटमध्ये नागरिकांची उडाली तारांबळ.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी. गटारं तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट दुकानांमध्ये. गांधी चौकात पाणीच पाणी. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापारी वर्ग नाराज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram