TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 17 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात आज बकरी ईद सण साजरा केला जातोय, ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ईदनिमित्त शुभेच्छा,तर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त.
मुंबईतही बकरी ईदीचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी, नमाज आदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा.
मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची गर्दी, गळाभेट घेत एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा
भिवंडीतही बकरी ईदचा उत्साह, कोटरगेट, दिवानशहा दरगाह , आसबीबीसह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदची नमाज अदा.
सोलापुरातील रंगभवन अहले हदीस ईदगाह येथे मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण, यावेळी मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने नमाजसाठी उपस्थित.
ईदीमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्याने शिवसैनिक आक्रमक, दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी.