Yavatmal Baby in Flood : पुरात अडकलेल्या बाळाची एसडीआरएफच्या जवानांकडून सुटका
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आनंदनगर या गावाला पुराचा वेढा पडला होता. या ठिकाणी 110 नागरिक अडकून पडले होते. यात माऊली सतीश चव्हाण हिला 1 महिन्याचे बाळ होते. पुराचा वेढा वाढत होता तसा तिचा जीव टांगणीला लागला होता.हेलिकॉप्टर ने एअर लिफ्ट सुद्धा खराब वातावरणाने होऊ शकले नाही. त्यामुळे ती अधिकच चिंतीत झाली. शेवटी sdrf च्या पथकाने तिला सुरक्षित स्थळी हलविले आणि तिचा जीव भांड्यात पडला.
Tags :
Yavatmal Helicopter Citizens Anandnagar Flood Siege Mahagao Taluk Mauli Satish Chavan 1 Month Old Baby Air Lift