Yavatmal : हर घर तिरंगा या अभियानाला यवतमाळमध्ये चांगला प्रतिसाद, राष्ट्रध्वज 23 रुपयांमध्ये उपलब्ध

Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हर घर तिरंगा या अभियानाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातही हे अभियान मोठ्या उत्साहात राबवलं जातंय. यवतमाळमध्ये 'हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत राष्ट्रध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांमध्ये नागरिकांना राष्ट्रध्वज 23 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर  स्वयंस्फुर्तीने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं आवाहनही प्रशासनाच्या वतिनं करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola