Yavatmal : पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
यवतमाळचे शिल्पकार रामू चव्हाण यांच्या संकल्पेतून संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा आझाद मैदानामधून पोहरादेवीच्या दिशेनं आज रवाना होणार आहे. यासाठी भव्य बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.