Yavatmal Fake Seeds : कपाशीच्या बनावट HTBT बियाण्यांमुळे शेतकरी संकटात, दुबार आणि तिबार लागवडीची वेळ

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसह आणखी एका संकटाचा सामना करावा लागतोय... कपाशीसाठी वापरलं जाणारं HTBT या बनावट बियाण्यांमुळे शेतकरी संकटात सापडलाय.. बनावट HTBT बियाण्यांमध्ये उगवन क्षमता नसल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार लागवड करावी लागत आहे.. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दीड लाख बियाण्यांची पाकिटे पोहोचतात.. ज्यांची किंमत जवळपास 11 ते 12 कोटी असते. तर राज्यातील कापूस उत्पादक असलेल्या 14 जिल्ह्यात 110 कोटींचे हे बियाणे रॅकेट मार्फत पोहोचतात.. त्यामुळे एक तर केंद्राने HTBT बियाणे अधिकृतरित्या पुरवावे अथवा या चोरट्या मार्गाने येणाऱ्या बनावट बियाण्यांच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola